गोव्याचे जलसंपदा मंत्री विनोद पालेकर यांनी काल रविवारी कणकुंबी येथील कळसा भांडुरा कामची पाहणी केल्यावर कर्नाटक सरकार हरामखोर असा अपशब्द वापरल्या नंतर सुरु झालेल्या राजकीय वक्तव्यात कर्नाटकाचे मुख्य सचेत आमदार अशोक पट्टण यांनी उडी घेतली असून विनोद पालेकर यांना महा हरामखोर असा उल्लेख केला आहे.
पालेकर यांना कर्नाटकातील जनता योग्य उत्तर देईल असे म्हणत जर त्यांनी आम्हाला पिण्याचे पाणी देत नसतील तर आम्ही गोव्याला भाजीपाला आणि दुध का म्हणून ध्यावा अस प्रश्न देखील उपस्थित केला आहे. गोव्याला बेळगावातून भाजीपाला दुध जाते त्यामुळे कर्नाटकची जनताच त्यांना उत्तर देईल अस ते म्हणाले. पालेकर यांना बेळगावबंदी करण्याबाबत विचार करू मात्र कन्नड संघटनांनी पालेकर विरुद्ध आंदोलन कराव असा सल्ला देखील त्यांनी कन्नड संघटनाना दिला आहे.
सोमवारी सकाळी जलसंपदा मंत्री एम बी पाटील पालक मंत्री रमेश जारकीहोळी कर्नाटक सरकारचे मुख्य सचेत अशोक पट्टण यांच्या सह कर्नाटक सरकारच्या आमदार मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने कणकुंबी येथील कळसा भांडुरा कालव्याची पाहणी केली, म्हादई नदी पत्रात कर्नाटका कडून बांधकाम होत असल्याचा गोवा सरकारच्या आरोपाचा नकार केला आहे.