एकूण २०० टी एम सी पैकी केवळ ५० ते ६० टी एम सी पाणी कर्नाटकातील आहे त्यातील १९० टी एम सी पाणी समुद्रात जाऊन मिसळते तरी देखील गोवा सरकार पाणी देण्यास टाळाटाळ करत आहे असा संताप कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम बी पाटील यांनी व्यक्त केला आहे.७.५६ टी एम सी पाणीकर्नाटकाला कर्नाटकाला द्या असा आदेश तत्कालीन वाजपेयी सरकारने दिला होता. बेळगावातील सर्किट हाऊस मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रोटोकॉल विसरत गोवा सरकार च्या मंत्र्याने कणकुंबी मध्ये येत आम्हालाअक्कल शिकवू नये अपशब्द वापरणे हे निंदनीय आहे कुणकुंबी मध्ये राज्य सरकारने कोणतेच काँक्रीटचे काम केलेलं नसून उगाच गोवा सरकार आरोप करत असल्याचे ते म्हणाले. म्हादई संदर्भात मनोहर पर्रीकर अमित शाह आणि बी एस येडियुरप्पा यांनी राजकीय प्लॅन केला आहे निवडणुकीत भाजपाला फायदा होऊ देत म्हणून पर्रीकर यांनी येडियुरप्पा यां पत्र का लिहिलं नसावं असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. शाह पर्रीकर आणि येडियुरप्पा तिन्ही पात्र नाटकातील नाटकातील महानाटककार आहेत. गोवा आणि कर्नाटकातील लक्ष वेधून घेण्यासाठी गोवा सरकार भाजपचे हे नाटक आहे असा आरोप करत कर्नाटकात सरकारने विवादित कणकुंबी प्रदेशात कोणतेही बांधकाम केले नाहीअसं असेल तर गोवा सरकारने का कोर्ट ऑफ कंटेम्पट दाखल करू नये असा प्रश्न उपस्थित केला. सध्या गोवा सरकार बॅकफूट वर असून न्यायालयीन लढाई लढाई आम्ही सज्ज आहे असं देखील ते म्हणाले .
पालेकर यांनी समस्त कर्नाटक आणि कन्नड जातेच अपमान केला असून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी माफी मागावी अशी मागणी देखील एम बी पाटील यांनी केली आहे