म्हादाई पाणी वादात आडमुठी भूमिका घेणाऱ्या गोवा सरकारला आर्थिक कोंडीत पकडा अशी मागणी कन्नड संघटनांनी जलसंपदा मंत्री एम बी पाटील यांच्या कडे केली.
बेळगावातील सर्किट हाऊस येथे कन्नड संघटनांनी भेट घेऊन सदर मागणी केली आहे.गोव्याचे मंत्री विनोद पालेकर यांनी कन्नडीगा विरुद्ध अपशब्द वापरल्याने त्यांच्या वर क्रिमिनल केस दाखल करा आणि बेळगाव हुन गोव्याला दररोज जाणारी भाजी दूध पुरवठा बंद करा अशी मागणी कन्नड संघटनांनी केली आहे.
कर्नाटकातुन गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या भरपूर असून हे रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने दांडेली सह इतर पर्यटन स्थळांचा विकास करावा अशी मागणी देखील कन्नड संघटनांनी केली आहे.अशोक चंदरगी,महादेव तलवार गणेश रोकडे आदी उपस्थित होते