Monday, November 25, 2024

/

बेळगावात समिती विरोधात निवडणूक लढवणार नाही-  नागनुरींच स्पष्टीकरण

 belgaum

बेळगाव कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र असून सीमा भागाचा अविभाज्य घटक आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे भविष्यात देखील राहील ही शिवसेनेची भूमिका आहे.आगामी विधान सभा निकडणुकीत बेळगावातील चार जागा सोडून इतरत्र कर्नाटकात निवडणूक लढवेल असं स्पष्टीकरण शिवसेना संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांनी केलं आहे.

ARVInd nagnuri
श्री राम सेना आणि शिवसेना एकत्रित रित्या  हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ,भ्रष्टाचार इतर मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे. मात्र समिती शिवसेना लहान भाऊ मोठ्या भावाची भूमिका आहे नेहमीच सेना समितीच्या पाठीशी आहे आणि राहील असा देखील ते म्हणाले.

बेळगावातील शिव सैनिकामध्ये  काहींना विधान सभा आणि नगर पालिकेचे निवडणुकीचे वेध लागले आहेत त्यामुळे यातूनच काहींनी  स्वतःच्या नैराश्येतून पक्ष विरोधी कृत्य सुरू केली आहेत असा देखील ते म्हणाले.

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.