सह संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी यांची हकालपट्टी करा अशी मागणी करत बेळगावातील शिव सैनिकांनी त्यांचा पुतळा जाळत शनिवारी निषेध केला.
काल शुक्रवारी हुबळी येथील पत्रकार परिषदेत सिद्धलिंग स्वामी यांनी बेळगाव आम्ही कर्नाटकाचा अविभाज्य घटक मानतो, तेंव्हा बेळगाव कर्नाटकातच राहील आणि तेथेही शिवसेना निवडणूक लढवेल असे वादग्रस्त वक्तव्य केले. श्री रामसेना आणी शिवसेना संयुक्तरित्या निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करताना हे वक्तव्य केले होते.
बेळगाव विरोधी आणि सीमावासीयांची भावना दुखावणारे हे वक्तव्य केलेल्या पत्रकार परिषदेत नागनुरी उपस्थित होते, मात्र त्यांनी ब्र देखील काढला नाही त्यांच्या या कृत्याचा शिव सैनिकांनी निषेध केला आहे.बेळगावातील शिव सेने बाबत नागनुरी हे मनमानी निर्णय घेत असतात असा देखील आरोप केला आहे.
कालच बेळगाव live ने हुबळी येथील पत्रकार परिषद आणि विशेष बातमी दिली होती त्याचा इम्पॅक्ट बेळगावात दिसला आहे .बेळगावातील सेना कार्यकर्त्यांनी आपण सीमा प्रश्न आणि मराठीसाठी बांधील असल्याचं दाखवून दिलं आहे.
शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्या नेतृत्वात प्रवीण तेजम ,राजकुमार बोकडे,प्रकाश राऊत, राजू तुडयेकर यांच्या सह रिक्षा सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.