बेळगाव सह संपूर्ण सीमाभागात सरकार अत्त्याचार करत मराठी फलक काढून टाकत आहे मात्र इथल्या मराठी जणांच्या हृदयातल मराठी प्रेम काढणे या सरकारला अशक्य आहे अशी टीका बार्शी येथील शिव चरित्रकार खंडू डोईफोडे यांनी केली आहे.
बेळगाव तालुक्यातील बेनकनहळळी येथे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते. शुक्रवारी दुपारी या मेळाव्याचे उद्घाटन झाले याच्या अध्यक्ष स्थानी तलुका समितीचे अध्यक्ष निन्गोजी हुद्दार होते. व्यासपीठावर मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी, माजी महापौर मालोजी अष्टेकर, मध्यवर्ती खजिनदार प्रकाश मरगाळे,माजी सनदी अधिकारी दिनेश ओउळकर,माजी आमदार मनोहर किणेकर, तालुका समितीचे एल आय पाटील,युवा आघाडीचे अध्यक्ष शाम पाटील ,बेनकनहळळी येथील लता पावशे होत्या.
यावेळी छत्रपती शिवाजी महराजांच्या प्रतिमेच पूजन खंडू डोईफोडे यांनी स्वामी विवेकानंद प्रतिमा पूजा दिनेश ओउळकर यांनी तर जिजामाता प्रतिमा लता पावशे यांनी केल.
शिवाजी महाराजांचा लढा देखील आपल्या मातीसाठीच होता तसाच सीमा भागातल्या मराठी जणांचा आहे, युवकां कडून शिक्षणाचा उपयोग जगण्यासाठी झाला पाहिजे अस सांगणारे शिवाजी महाराज हे पाहिले होते युवकांनी व्यसनापासून दूर राहिले तर आपले ध्येय मिळवणे शक्य आहे अस देखील डोईफोडे म्हणाले.
घरभेद्या पासून लढ्याला शिथिलता- ओऊळकर
न्यायालयीन लढाई सोबत जन आंदोलनाची नितांत गरज आहे घर भेद्या पासून लढ्याला शिथिलता आली आहे त्यामुळे ही शिथिलता दूर करूनच आगामी निवडणुकीला समोरे गेले पाहिजेयासाठी बूथ लेवल वर काम करा असा सल्ला माजी सनदी अधिकारी दिनेश ओउळकर यांनी दिला.
ते पुढे म्हणाले पोटलु यांच्या बलीदानातून आंध्राची निर्मिती झाली आंध्र हे तेलगु भाषेच राज्य निर्माण झाल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील राज्य पुनर रचना आयोगावर टीका करताना मराठी माणसाचे पंख छाटूनकेंद्राने पुंडशाही दाखवली अस वक्तव्य केल होत बेळगावला एक प्रकारे पाठिंबा दिला होता याची आठवण करून दिली.
मेहरचंद महाजन हा भ्रष्टाचारी होता म्हणून केरळने बहिष्कार टाकत त्यांना त्या काळात कोणत्याही प्रकारच निवेदन दिल नव्हत असही ते म्हणाले.
तर मुलांना मराठी शाळेलाच पाठवा- लता पावशे
जिजाऊ बद्दल बोलताना लता पावशे म्हणाल्या की जय महाराष्ट्र म्हणणार आणि आपली मुल इंग्लिश माध्यमाला पाठवणार ही भूमिका बदलायला हवी त्यामुळे पालकांना जर खरच मराठीवर प्रेम असेल तर आपल्या मुलांना मरठी माध्यमाच्या शाळेला पाठवा अस आवाहन केल.मिरवणुकीत प्रत्येक ठिकाणी दारूच्या नशेत छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणे कितपत योग्य आहे अस प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी बोलताना मालोजी अष्टेकर म्हणाले की शिवाजी महाराजांची प्रेरेक शक्ती म्हणजे जिजाऊ होत्या. जिजाउना एका बाजूला सख्खा भाऊ होत दुसऱ्या बाजूला स्वतचा पती अश्या वातावरणात शिवाजी महाराजांना त्यांनी घडवल आहे त्यामुळे सर्वाचा त्यांनी आदर्श घ्यावा अस आवाहन केल.
बेळगाव तालुक्याच्या अनेक गावातून कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित होते बेनकनहळळी गाव परिसर युवक मेळाव्यामुळे भगवमय बनलं होत. सकाळी मिरवणुकीसह सह पाहुणे शामियान्यात दाखल झाले यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी, गौडाचा निषेध
कानडीकरणाचा फतवा काढणारे जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला आणि शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्या नारायणगौडाचा निषेधाचा ठराव यावेळी संंमत करण्यात आला. जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी सीमाभागातील सार्वजनिक, सरकारी कार्यालयातील सर्व फलक, माहितीपत्रके कानडीतून देण्याचा फतवा काढला आहे. ही कर्नाटक सरकारची दंडेलशाही असून त्याचा निषेध मेळाव्यात करण्यात आला. त्याचबरोबर ‘शिवाजी महाराज की जय,’ म्हणण्यावर बंदी घालण्याची मागणी करणार्या करवेचा म्होरक्या नारायणगौडा याचा सभेत निषेधाचा ठराव युवा आघाडी अध्यक्ष अॅड. शाम पाटील यांनी मांडला. उपरोक्त ठराव टाळ्यांचा गजरात संमत केला.