बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातलं आकर्षण असणाऱ्या धर्मवीर संभाजी चौकाच्या सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे. महापौर संज्योत बांदेकर यांनी पूजन करून या सुशोभिकरन कामाचं उदघाटन केलं.शिव प्रतिष्ठान चे अध्यक्ष किरण गावडे ,शिव चरित्राचे अभ्यासक रावसाहेब देसाई ,नगरसेविका माया कडोलकर यावेळी उपस्थित होते .
माजी महापौर आणि प्रभाग क्रमांक ३१ नगरसेविका सरिता पाटील यांच्या प्रयत्नातून काम होत असून यासाठी पाच लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. याच ठिकाणी एक महिना सम्भाजी महाराज बलिदान मास पाळलं जातो या शिवाय दर सोमवार शुक्रवार पुतळ्याच पूजन अभिषेक करण्यात येतो त्यामुळे हा चौक सुशोभीकरण केला जावा अशी मागणी अनेक दिवस पासून होती त्याची दखल घेत हेकाम हाती घेतलं असल्याची माहिती सरिता पाटील याची दिली आहे .
सुशोभीकरनाच्या निमित्ताने चौकात नवीन पेव्हर्स ब्लॉक नवीन लॉन ,रंगरंगोटी तसेच समोरील बाजूस ग्रॅनाईट आणि नवी रिलिंग करणार असल्याचं देखील पाटील म्हणाल्या .
सम्राट अशोक चौक ,टिळक चौक शेरी गल्ली चौकाचे काही प्रमाणात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यावेळी पालिका अभियंते एन व्ही हिरेमठ मदन बामणे गुरुदत्त मित्रमंडळ केळकरबाग सह जायंट्स चे पदाधिकारी देखील हजर होते.