बेळगावच्या खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध मास्टर शेफ संजीव कपूर आपले सुरा वाई हे हॉटेल बेळगावात सुरू करतायेत. ही त्यांची एक हॉटेलची चेन असून देशातल्या नामवंत शहरात ते ती खुली करीत आहेत.
खाध्यपदार्थ, पेये, संगीत आणि मोकळेपणा देणारी जागा ही या येऊ घातलेल्या हॉटेलची वैशिष्ट्ये आहेत. खरे तर याचा उच्चार सुरा वी असा आहे. वी किंवा वाई म्हणजे फ्रेंच मध्ये जीवन. भारतात सूर म्हणजे संगीत तर सुरा म्हणजे मध्य, या साऱ्या शब्दांचा अनोखा मिलाफ असलेल्या या हॉटेलात सूर, सुरा आणि जीवन यांचा मिलाफ घडवण्याचा प्रयत्न असेल.
शेफ संजीव कपूर यांनी स्वतः भारतीय, विदेशी आणि ऊ दोन्हीचा संगम करून बनवलेल्या खाध्यपदार्थांचा संगम येथील मेनूत असणार आहे.
खवय्यांची चांदी होणार, अजून ठिकाण कुठे ते कळलेले नाही, आपल्या हातात वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.