मराठी विद्यामंदिर कलीवडे शाळेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या शाळेचा विद्यार्थी अनिरुद्ध रवींद्र कांबळे, (इयत्ता 7वी) विमानाने तिरुअनंतपुरमला जाणार असून येथे भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (ISRO) ला भेट देण्याची संधी त्याला चालून आली आहे.
भारतातीलच नाही तर जगातील अग्रमानांकित अवकाश संशोधन संस्था ISRO ची कार्य पद्धती समजून घेण्यासाठी त्याला या बालवयातच आमंत्रण आले.
यामुळे तिरुअनंतपुरम येथे विमानानाने जाण्याची संधी अनिरुद्धला मिळाली आहे
ही निवड त्याने दाखवलेल्या हुशारी मुळे झाली आहे. तालुकास्तरावर निबंध स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये तो पात्र झाला त्यानंतर जिल्हास्तरावर मुलाखत घेण्यात आली यामध्येही त्याने यश मिळवले. यात त्याला शाळेचे शिक्षक आणि पालकवर्गाचे मार्गदर्शन लाभले आहे.
त्याबद्दल या छोट्या दोस्ताचे सगळीकडे खूप खूप अभिनंदन होत आहे, त्याला बेळगाव live कडूनही शुभेच्छा!