Tuesday, December 3, 2024

/

सर्प मित्र निर्झरानी पकडला उडणारा सर्प

 belgaum

शहरात  दुर्मिळ उडणारा सोनसर्प टिळकवाडी येथे निर्झरा चिठ्ठी यांनी पकडला. घनदाट जंगलात शोधूनही न सापडणारा,देशातील सर्वात वेगवान,बेसुमार जंगल तोडीमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असणारा चक्क नागरी वस्तीत आढळला आहे.
महर्षी रोड टिळकवाडी येथे अजय चौगुले यांना हा सर्प  कुंड्याखाली बसलेला आढळला त्वरीत त्यानी सर्प मित्र आनंद चिठ्ठी यांना कळविले त्यावेळी आनंद चिठ्ठी हे दुसर्या काॅलवर लांब (नेसरगी)  असल्याने त्यानी त्वरीत त्यांची पत्नी निर्झरा यांना घटनास्थळी पाठवले निर्झरा यांनी  तो सर्प पकडला.

NIRjara

या पुर्वी  मांज्र्या, सिलोन मांज्र्या, मंडोळ, तस्कर  हे दुर्मिळ सर्प व्हॅक्सीन डेपो परिसरात आढळले आहेत. हा परिसर जैववैविधतेने समृद्ध आहे हे पुन्हा अधोरेखीत झाले आहे. पर्यावरणाचे संतुलन ढळत असताना  या भागाचे संवर्धन करणे तितकीच आपली जबाबदारी वाढली आहे. असे सर्प मित्र आनंद चिठ्ठी यांनी सांगितले.

सुमारे अडीज वर्षे वयाचा 34 इंच लांबीचा हा सर्प आहे.काळया, लाल व सोनेरी चौकड्या असणारा हा सर्प अतिशय सुंदर दिसतो. सौम्य विषारी असणारा हा सर्प   5 फुटापर्यंत वाढतो.बेडुक, सरडे, पाली व छोटे पक्षी  हे याचे प्रमुख भक्ष आहे. याची मादी जुन जुलै मध्ये 8 ते 10 अंडी घालते.अशी माहिती देखील चिट्टी यांनी बेळगाव live कडे दिली.

हा सर्प कसा उडतो?

पंख नसताना हा सर्प उडतो कसा हा प्रश्न सर्वानाच पडला असणार!हा झाडांवर वास्तव्य करणारा वृक्षेय सर्प आहे. ऐका झाडांवरून दुसऱ्या झाडांवर हा सर्प उडी मारण्यासाठी जेव्हा आपले लांब व बारीक शरीर हवेत झोकून देतो तेव्हा शरीर चेपटे (रिबन प्रमाणे) करूण शरीराचा खालील भाग पॅराशुट प्रमाणे आत घेतो. जेथे जायचे आहे तिकडे शरीर वळवळतो. अशाप्रकारे एकावेळी 10 फुटापर्यंत हा ऊडी घेऊ शकतो. तर ऐका झाडांवरून दुसर्या झाडांवर 100 मीटर लांब ऊडत जाऊ  शकतो. ताशी 12 की.मी. धावणारा हा देशातील सर्वात वेगवान सर्प आहे.पश्चिमघाटासह बिहार ओरिसा पश्चिम बंगाल येथे आढळतो ऊडता  सोनसर्प (ornate flying snake)वरील माहिती चिट्टी यांनी दिली

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.