जगात सर्वात जास्त युवा असलेला देश म्हणजे भारत होय असे मत ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुख्य प्रोफेसर अनिल डी सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केलं आहे. बेळगावातील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या १७ व्य पदवीदान समारंभात सहभागी होऊन डॉक्टर ऑफ सायन्स पदवी स्वीकारल्या ते बोलत होते.
देशात २५ वया खालील युवकांची लोकसंख्या २५ टक्के आहे भारताने आपल्या विकासा बरोबर जगाला लागणाऱ्या आवश्यकता कडे देखील ध्यान द्यावे असे आवाहन करत सहस्त्रबुद्धे यांनी ‘सर्व्हे भवनू सुखींनो भवन्तु’ पुरातन कला पासून चालत आलेल्या आजही युवकांनी बोध घ्यावा असे ते म्हणाले.
सत्य धर्म,संस्कार,एकमेकांचे आदर स्वतःच्या आरोग्य बद्दल काळजी आजच्या जीवनात गरजेचं बनले आहे केंद्र सरकारच्या स्किल इंडिया ,डिजिटल इंडिया क्लीन इंडिया स्मार्ट सिटी मेक इन इंडिया, विकास भारत या कार्यक्रमात युवकांचा सहभाग पाहिजे जनतेने सरकार वर विश्वास ठेऊन या योजना यशस्वी झाल्या पाहिजेत असंही ते म्हणाले.
यावेळी अनके इंजिनियरिंग विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात आले