न्यूयॉर्क आणि शिकागो सारख्या शहरात फूड ट्रक ची संस्कृती आहे. फिरत्या खाद्य पदार्थांची ही संस्कृती आपल्या बेळगावातही रुजत आहे.संध्याकाळच्या वेळात वाफाळलेल्या खाद्य पदार्थांची वाहने इतरत्र फिरून अनेकांचे पोट भरू लागली आहेत.
पिझ्झा, बार्बेक्यू केलेले पदार्थ, डेजर्ट्स आणि इतर बरेचकाही या फूड ट्रक मध्ये मिळत आहे. आता यामध्ये इटालियन येस्केप या नव्या फूड ट्रकची भर यात पडली आहे.
गोगटे कॉलेज च्या समोर संध्याकाळी ५ ते १० या वेळेत थांबून ते खवय्यांची सेवा करत आहेत.