बेळगावात वारंवार होणारे दंगे निष्क्रिय तपास यंत्रणा यावर उपाय म्हणून बेळगावात एन आय ए चे कार्यालय(NAtional Investingation Agency) करण्यासाठी प्रयत्नशील आहे.अशी माहिती केंद्रीय कौशल्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी दिली.
सोमवारी दुपारी त्यांनी कन्नड साहित्य भवन येथे बेळगाव उत्तर मतदार संघातील बूथ कमिटी आढावा बैठकीत घेतला आहे.बेळगाव उत्तर भागात लँड जिहादचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करत कर्नाटकात मंगळुरू बेळगाव या दोन ठिकाणी अशी विभागीय अशी एन आय ए कार्यालया साठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
प्रभारी झाल्या पासून उत्तर मतदार संघातील पदाधिकारी माझ्या संपर्कात आहेत बूथ कमिटी चे काम चांगलं असे सांगत सर्व पदाधिकाऱ्यांना होम वर्क देत पुढील बैठकीत आज दिलेला गृहपाठ घेणार असल्याचे देखील स्पष्ट केलं आहे.यावेळी भाजप अध्यक्ष राजेंद्र हरकुनी,दीपक जमखंडी, किरण जाधव अनिल बेनके आदी उपस्थित होते.