उत्तर विभागाचे पोलीस महा निरीक्षक म्हणून आय जी पी अलोक कुमार यांनी आपल्या कार्याचा पदभार सोमवारी स्वीकारला आहे . आय जी पी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अलोककुमार यांनी पदभार स्वीकार केल्यावर पोलीस आयुक्त डी आय जी डी सी राजप्पा ,पोलीस अधीक्षक रवी कांते गौडा सह अनके वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं .
उत्तर विभाग आय जी रेंज हा राज्यातील सर्वात मोठा विभाग असल्याने हेल्मेट सक्ती करून अपघात संख्या कशी कमी करता येईल युवा विभागात कायदा सुव्यवस्था कशी चांगली हाताळता येईल यावर अधिक भर दिला जाईल असे अलोक कुमार माध्यम प्रतिनिधी शी बोलताना सांगितले .