सीमा भागात छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा म्हणू नये असं वादग्रस्त वक्तव्य करत समस्त जनतेच्या भावना दुखावलेल्या नारायण गौडा वर कारवाई अशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आली.
सोमवारी निवासी जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ यांच्या द्वारे केंद्रीय गृह मंत्र्यांना निवेदन देऊन वरील मागणी करण्यात आली आहे.एकीकडे कर्नाटक सरकार शिवाजी महाराजांची शासकीय पातळीवर जयंती साजरी करतंय दुसरी कडे नारायण गौडा सारखे लोक शिवाजी महाराजां बद्दल वादग्रस्त वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करतात राज्य सरकारने अश्या व्यक्ती वर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांच्याशी देखील यांच्याशी देखील चर्चा करा अशी मागणी केली यावर माझी जात धर्म खाकी आहे दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वर कारवाई करू अस आश्वासन दिलं.
मध्यवर्ती महाराष्ट्र समिती अध्यक्ष दीपक दळवी,मालोजी अष्टेकर प्रकाश मरगाळे,आमदार अरविंद पाटील माजी आमदार मनोहर किणेकर आदी यावेळी उपस्थित होते.