Saturday, December 28, 2024

/

(हिरड्यांचा आजार) पायोरिया-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

पायोरिया हा हिरड्यांचा आजार आहे. हा आजार अनेक लोकांना होतो. दातांच्या मुळाभोवती असलेल्या आवरणाला किंवा दंतवेष्टनाला इजा होते. त्यामुळे दातांची मुळे कमकुवत होतात. दात किडू लागतात. दातांमध्ये अन्नकण अडकून ते कुजतात. पू तयार होतो. हिरड्या आक्रसतात. वयस्कर व्यक्तींमध्ये पायोरिया या हिरड्यांच्या आजाराने दात पडतात.

dr sonali sarnobat 3
कारणे आणि लक्षणे : या आजारात हिरड्या हुळहुळ्या, नाजूक बनतात. हिरड्या दाबल्या तर दातांच्याकडेने पू बाहेर येतो. हा पू पोटात जातो. हा आजार जेव्हा गंभीर रुपधारण करतो तेव्हा हिरड्या सुजतात आणि पू पोटात गेल्यामुळे पचनाचेही काम बिघडते. पचनक्रिया बिघडते. यकृताच्या कामात अडथळा येतो. अशा रितने दूषित बनलेल्या हिरड्यांच्या या स्त्रावामुळे पूर्ण शरीरावर परिणाम होतो.
जीवाणूंमुळे पायोरिया रोग जास्त वाढतो. कारण दातांवर हानीकारक जीवणूंचाही हलका थर सतत बसत असतो. हा थर दात स्वच्छ करुन काढावा लागतो. विशेषत: काही खाल्यानंतर किंवा जेवल्यानंतर दात स्वच्छ घासले नाहीत तर दातांमध्ये अडकलेल्या अन्नकणांमुळे थोड्याच वेळात जीवाणूंची झपाट्याने वाढ होते. यालाच वैद्यकिय भाषेत बॅक्टेरियल प्लाक म्हणतात. हे कीटण किंवा प्लाक अनेक विषारी पदार्थ तयार करतात. त्यांच्यामुळे हिरड्यांना इजा पोहोचते. हिरड्यांची आग होते. त्या नाजूक बनतात आणि त्यांच्यातून सहज रक्त येते. जीवाणूंमुळे सर्व व्यवस्थेची प्रतिकारशक्ती कमी होते. दात नीट न घासणे, अन्नकण बराच वेळ दातात राहाणे, टूथपीक्सचा अयोग्य वापर या कारणांनीही पायोारिया होतो.
अतिरिक्त प्रमाणात चहा, कॉफी, तंबाखू व मद्य यांच्या सेवनामुळे दातांचे व हिरड्यांचे आरोग्य बिघडते व पायोरिया होऊ शकतो.
उपचार
होमिओपॅथी- अठ्ठावीस वर्षाचा कार मेकॅनिक श्रीकांत याला सतत गुटखा खायची सवय! सकाळचे मुखमार्जन झाले की गुटखा चर्वण सुरूच! खाल्ल्यानंतर जेवणानंतर चूळ भरायची सवय नाही. दात व्यवस्थित घासायचे नाहीत. हळुहळू त्याच्या हिरड्या मऊ विसविशीत होऊ लागल्या, दातांच्या बाजूने रक्त- पू यायला लागले. तोंडाला दुर्गंधी येऊ लागली. यातून आपणाला कॅन्सर होईल, या भीतीने त्याने तातडीने उपचार सुरू केले. तंबाखूही बंद केला. परंतु आग लागल्यावर विहीर खणून काय उपयोग? हा आजार कोणत्याही उपचारांनी बरा होईना. शेवटी होमिओपॅथी तर ट्राय करून पाहू म्हणून आमच्याकडे आला. त्याची हिस्टरी पाहून पायोरियावरचे अक्यूट मेडिसीन दिल्यावर पहिल्या तीन दिवसातच रक्त व पू येण्याचे थांबले. एक महिन्याचा कोर्स झाल्यावर हिरड्यांचा विसविशीतपणा कमी होऊन तोंडाला खराब वास येण्याचेही बंद झाले. तीन महिनत श्रीकांत पूर्ण बरा झाला.
होमिओपॅथीमध्ये कॅलेंडुला, मर्क- सॉल, सिलीसशिया, प्लँटगो, क्रिओसोट, गनपावडर, कार्बोव्हेज इ. औषधे पायोरियाच्या कमी अधिक लक्षणांवरून वापरता येतात.
बाराक्षार- सिलीशिया 12ु किंवा 30ु पायोरियावर अतिशय उपयुक्त आहे.
निसर्गोपचार- पेरूची कोवळी पाने चघळून  खाल्ली तर हिरड्यातून रक्त येत नाही. पेरूची मुळे व फांदीचे खोड पाण्यात उकळवून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. कच्चा पेरू चांगला चावून खाल्याने दात हिरड्यांना चांगला मसाज होतो. डाळींबाच्या वाळल्या सालीची पूड, मिरपूड मिसळून दंतमंजन तयार करून त्याने दात घासावेत. जेवणानंतर लगेच लेट्यूसची पाने चघळावीत. पालकाच्या पानांचा व गाजराचा रस प्रत्येकी 125 मिली एकत्र करून रोज प्यावा. हिरड्या सशक्त होतात.
प्रतिबंध- चहा, कॉफी, तंबाखू, चॉकलेट, मांसाहार, गोड पदार्थ यांचा वापर टाळावा. अन्न चावून खावे. कच्ची फळे चावून चावून खावीत. त्यामुळे दात व हिरड्या घट्ट होतात. जेवणानंतर खळखळून चूळ भरावी.

आहार- ताजी फळे, हिरवे सॅलड, लिंबू, चांगल्या उकडलेल्या भाज्या, सुकामेवा, दूध, पूर्णांश गव्हाच्या (कोांड्यासकट) पोळ्या किंवा ब्राऊन ब्रेड, भाजलेले कणीस यांचा आहारात समावेश करावा. पांढरा पाव, साखर, डबाबंद अन्न पदार्थ, प्रक्रिया केलेले पाकिटबंद पदार्थ टाळावेत.

डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक 9916106896
सरनोबत क्लिनिक 9964946918

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.