केंद्रातील मोदी सरकारने निवडणूक काळात सत्तेवर येई पर्यंत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव देण्याच आश्वासन दिल होत मात्र मात्र साडे चार वर्ष उलटली तरी अजूनही ते पाळलेल नाही त्यामुळे मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. बेळगाव तालुक्यातील हिंडलगा सुळगा येथील सहकारी पथ संस्थेच उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तरुण भारत संपादक किरण ठाकूर, समितीचे मनोज पावशे,ए पी एम सी अध्यक्ष निन्गाप्पा जाधव, जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे ,अशोक पाटील उपस्थित होते.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे असलेले स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करू अस आश्वासन दिल होत मात्र ते अध्याप पाळलेल नाही शेतकऱ्यांच पिक उत्पादन दुपट करतो अस देखील आश्वसन दिल होत मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांची उत्पादन एवजी कर्ज दुपट झाली आहेत असा टोला त्यांनी लगावला.
मराठी भाषकांनी एक झेंड्याखाली याव- किरण ठाकूर
महाराष्ट्राचे खासदार आणि आमदारांची लॉबीने केंद्रावर दबाव आणल्यास झटक्यात सीमा प्रश्न सुटू शकतो मात्र मराठी राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा आड येत असल्याची खंत तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांनी व्यक्त केली.
कर्नाटक सरकार सीमा भागातील मराठी जणावर भारतात घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सारखी वागणूक देत आहे गेली ६० वर्ष आम्ही हे हाल सोसत आहोत आम्ही राष्ट्रीय प्रवाहात देशासाठी वाहून घेतलो असतो. अश्या दिरंगाई धोरणात आज विधान सभा निवडणुकाना सामोरे जावे लागणार आहे असे वाटत आहे यामुळे सर्व मराठी भाषिकांनी मतभेद बाजूला सारून भगव्या झेंड्या खाली एकत्र यावे असे आवाहन देखील केल . सरकारच्य जमीन संपादन विरोधात लढून जमिनी वाचवलेल्या शेतकरी नेते नारायण सावंत यांच्या लढयाच कौतुक खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी केल. यावेळी सावंत यांनी शेट्टी यांना निवेदन सादर केल
अन… अश्रू झाले अनावर
सुळगा येथील सहकारी पथ संस्था उद्घाटन कार्यक्रमात या गावातील कन्नड सक्ती आंदोलनात हुतात्म्य साकारलेल्या वारसांचा,आंदोलकांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी हुतात्मा भावकु कदम यांची आई लक्ष्मी कदम या सत्कार स्वीकारल्यावर त्यांचे अश्रू अनावर झाले यावेळी उपस्थितानी हळहळ व्यक्त केली.