राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच की जय अशी घोषणा कर्नाटकात देऊ नये अस वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कर्नाटक रक्षण वेदिकेचा अध्यक्ष नारायण गौडा यांच्या वर कारवाई करा अशी मागणी करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देणार असल्याचा निर्णय मध्यवर्ती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी नारायण गौडा याचं समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याचा निषेध देखील करण्यात आला.
शनिवारी सायंकाळी मराठा मंदिरात मध्यवर्ती समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांनी आगामी १७ जानेवारीला होणारा ६२ हुतात्मा दिन घटक समित्यांनी गांभीर्याने पाळावा अस आवाहन करत एक मध्यवर्ती अध्यक्ष म्हणून सुप्रीम कोर्टातील कामकाजा आढावा घेण्यात कधीही कमी पडणार नसल्याच आश्वसन दिल.
गेल्या नोव्हेंबर मध्ये झालेल्या मेळाव्यात बंदी झुगारत समितीच्या मेळाव्यात सामील होऊन सीमा भागातील मराठी जनतेला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांच अभिनंदनाचा ठराव देखील मांडण्यात आला. सुप्रीम कोर्टातील दाव्या संदर्भात माहिती देताना अड राजाभाऊ पाटील यांनी १६ जानेवारीला दाव्या संदर्भात दिल्लीत सिनियर कौन्सिलर हरीश साळवे,माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती देत लवकरच पुढील सुनावणी साठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केल.