रविवारचा दिवस म्हणून काहीतरी नवे प्लॅनिंग करण्यापूर्वी जरा ही बातमी वाचा, तुमच्या साऱ्या नियोजनावर पाणी फेरणारी ही बातमी आहे, उद्या रविवारी दि ७ रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत शहरात बत्ती गुल असणार आहे.
हेस्कॉमने एक प्रेस नोट च्या माध्यमातून शहरवासीयांना याबद्दल खबरदारीची सूचना दिली आहे. नेहरू नगर पॉवर स्टेशन येथील ११० केवी केंद्रात दुरुस्तीची कामे असल्याने काही फिडर बंद राहतील, अशी सूचना करण्यात आली आहे.
खालील फिडर वरून वीजपुरवठा होणार नाही
११० केवी- नेहरू नगर
एफ १- कॅन्टोन्मेंट
एफ २- नानावाडी
एफ ३- हिंदवाडी
एफ ४- मारुती गल्ली
एफ ५- शहर विभाग
एफ ६- टिळकवाडी
एफ ८- शहापूर
एफ १०- पाटील गल्ली
एफ ११- सिव्हील हॉस्पिटल
३३ केवी- हनुमान नगर, सह्याद्री नगर
एकूणच संपूर्ण शहरात दिवसभर वीज राहणार नाही, घरी बसून कंटाळण्यापेक्षा यानिमित्ताने बाहेर पडलेले जास्त बरे. हो की नाही…….?