दसरा आणि दिवाळी तसेच ख्रिसमस मध्ये आयोजित हॉलिडे स्पेशल ट्रेन ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, यामुळे नैऋत्य रेल्वेने संक्रांतीसाठीही हॉलिडे स्पेशल रेल्वे जाहीर केली आहे.
१२ जानेवारीला ही रेल्वे यशवंत पूर ते बेळगाव असा प्रवास करणार आहे. १५ जानेवारीला ती बेळगावहून परतीचा प्रवास करणार आहे.
रविवार दि १४ ला संक्रात आहे. शुक्रवारी १२ रोजी रात्री ८.१५ ला निघून शनिवारी दि १३ ला सकाळी ८.१० वाजता ही रेल्वे बेळगावला येईल.
सोमवारी दि १५ रोजी सकाळी ६.२० ला ही रेल्वे निघणार आहे, सायंकाळी ७.१० ला ती यशवंत पूर ला पोचणार आहे.