Saturday, December 28, 2024

/

नारायण गौडांच शिवाजी महाराजांच्या विरोधातल वादग्रस्त वक्तव्य वायरल

 belgaum

नेहमी मराठी भाषकांच्या विरोधात गरळ ओकणारे कन्नड रक्षण वेदिकेचे अध्यक्ष नारायण गौडा यांचं छत्रपती शिवाजी महाराजां विरोधातल वक्तव्य बेळगावात सोशल मीडिया वर वायरल झालं आहे.
दोन दिवसापूर्वी नारायण गौडा यांनी विजापूर जिल्ह्यातील इंडी येथे झालेल्या एका कार्यक्रमात शिवाजी महाराजां बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होते ‘छत्रपती शिवाजी महाराज ही घोषणा देऊ नये’ असं म्हणत बेळगावातील समिती आमदारा विरोधात देखील गरळ ओकली होती.

narayan gouda krvया घटनेनंतर गौडा यांच्या पुतळ्याचं विजापूर भागात दहन करत आंदोलन करून निषेध करण्यात आला होता. या सर्व घटनांचे व्हीडिओ बेळगावात देखील सोशल मीडियावर वायरल झाले आहेत .छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका राज्य जाती धर्माचे नसून समस्त हिंदू धर्माचे देशाचे आदरस्थान असताना कन्नड वेदिकेच्या अध्यक्षा कडून झालेल्या वक्तव्याचा समाचार विजापूर भागातील अनेकांनी घेऊन त्यांना घरचा आहेर दिला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.