काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी उत्तर कर्नाटकाचा प्रवास सुरु केला आहे काँग्रेस साधना मेळावे तर भाजपच्या परिवर्तन यात्रेकडे माझं सूक्ष्म लक्ष आहे असे मत माजी मुख्यमंत्री एच डी कुमार स्वामी यांनी व्यक्त केलं आहे. शुक्रवारी सकाळी सर्किट हाऊस मध्ये पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारी कार्यक्रमात सरकारी करत राजकीय टीका करत फिरत आहेत. राज्य सरकारने केलेल्या जाहिरातीची जलसंपूलन योजनांची चुकीची माहिती दिली जात असून स्वतःचा उदो उदो सरकारने चालवला असल्याचं ते म्हणाले.
एक माजी पंत प्रधान म्हणून देवेगौडाना भेटायला केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आले होते रेल्वे बद्दल माहिती त्यांनी जाणून घेतली आमची भाजप बरोबर मैत्री नाही असं देखील कुमार स्वामी यांनी स्पष्ट केलं दुसऱ्या कोणत्याच पेक्षा सोबत आमची युती नाही भाजप आणि काँग्रेस या नाण्याच्या दोन बाजू आहेत मंगळुरु मलबार भागातच का जास्त दंगे होतात? हुबळी बागलकोट मध्ये का दंगे कमी होतात असं देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला. शांत अश्या कर्नाटक राज्यात भाजप कॉग्रेसने दंगे पेटवलेत राज्यातील जनतेने ११३ जागा दिल्यास स्वतंत्र सरकार जे डी एस देईल उत्तर कर्नाटकात कमीत कमी ४५ जागेवर जे डी एस जिंकेल असं देखील ते म्हणाले.