नेतृत्व हे चारित्र्यवान आणि निष्कलंक असलं पाहिजेत ज्यावेळी नेतृत्वावर डाग पडेल त्यावेळी नेतृत्व संपेल अस मत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे.
प्यास फाऊंडेशन च्या वतीनं बेळगाव तालुक्यातील अरळीकट्टी गावात पाणी अडवून तलाव लोकार्पण केल्यावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पाण्यासाठी भावा भावात गावागावात राज्यात भांडण होत आहेत त्यामुळे देशातील जनतेने पाण्याचं महत्व ओळखलं पाहिजे पावसाचा एक थेंब ही वाया जायला देऊ नका असा सल्ला देखील अण्णांनी अरळीकट्टी ग्रामस्थांना दिला आहे
प्यास फाऊंडेशन च्या वतीनं अरळीकट्टी येथे सुख्या तलावाचे पुनर्जीवन करण्यात आले आहे त्या तलावाचे लोकार्पण करण्यात आलं.पाणी ही देखील राष्ट्रीय संपत्ती आहे त्यामुळे पाण्याचा वापर जपून करा बेळगावात प्यास फौंडेशन चे कार्य चांगलं असल्याचे गौरव उदगार देखील हजारेंनी काढले.
राळेगणसिद्धी मध्ये केलेल्या सर्व प्रयोगाची माहिती अण्णांनी ग्रामस्थांना दिली.यावेळी जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी रामचंद्र राव,नागनुर रुद्राक्षीमठ स्वामीजी,कुडल संगम स्वामीजी, आदी उपस्थित होते.सुरुवातीला प्यास चे माधव प्रभू यांनी सर्व माहिती दिली. यावेळी भ्रष्टाचार निर्मूूलन सुजित मूळगुंद, प्यास चे संचालक उपस्थित होते.