जुन्या धारवाड रोड वरील रेल्वे ओव्हरब्रिज चे काम आता संपले आहे. एकूण ५८ पैकी ३२ गिर्डर चढवण्यात आले आहेत. उर्वरित गिर्डर चढवण्यास आणखी महिन्याचा कालावधी लागणार आहे.
दररोज ३-४ गिरडर्स बसवण्यात येत आहेत. सगळे गिरडर्स बसवण्यात आल्या नंतर काँक्रीट घालण्यात येणार आहे.
या रेल्वे ओव्हरब्रिज ला एकूण १४ पिलर्स आहेत. रुपाली हॉल पर्यंत १४ आणि जिजामाता चौक पर्यंत १० अशी त्यांची संख्या आहे, हे ब्रिज ४० फूट रुंद असून एकूण खर्च २४ कोटीच्या घरात आहे.
२४ जानेवारी २०१७ ला कामाला सुरुवात करण्यात आली असून १८ महिन्यात ते पूर्ण करायचे होते, त्यापैकी १२ महिने केंव्हाच संपले आहेत.
खासदार सुरेश अंगडी यांनी डिसेंबर पर्यंतची डेडलाईन दिली होती, पण तसे शक्य नाही. अधिकृत वेळे नुसार आणखिन ६ महिन्याचा वेळ शिल्लक आहे. हे काम पूर्ण झाल्यास सध्या पडत असलेला कपिलेश्वर रेल्वे गेट आणि काँग्रेस रोडवरील रहदारीचा ताण कमी होऊ शकणार आहे.
सध्याच्या कामाची परिस्थिती पाहता मे च्या शेवटाला काम पूर्ण होऊ शकेल अशी आशा आहे.