सौन्दत्ती येथील रेणुका देवीच्या दर्शनास गेलेल्या बेळगावातील एका महिलेचे अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण लंपास केल्याची घटना यात्रे दरम्यान घडली आहे . या बाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार सोमवारी दुपारी बेळगाव शहरातील जाधव कुटुंबातील तीन महिला आणि एक पुरुष रेणुका देवीच्या दर्शनासाठी गेले होते. जोगन भाव येथे दोन महिला अंघोळी साठी विहिरीत गेल्या होत्या तर एक महिला विहिरी बाहेर थांबली होती त्याकाळात सोबत असलेला पुरुष देखील बाहेर होता. दोन महिलांची वाट पाहत थांबलेल्या महिलेची गर्दीत चार जोगत्यानी किरकोळ निमित्य करून कळ काढली त्यावेळी झालेल्या झटापटीत गळयातील ७० हजार किंमतीचा अडीच तोळ्याचा गंठण लंपास केला . या प्रकरणी जाधव कुटुंबीयांनी पोलिसात फिर्याद नोंदलेली आहे .
यात्रा काळात गर्दी भरपूर असते महिलांनी किंमती दागिने घालून सौन्दत्ती यात्रेस येऊ नये असे आवाहन केलेलं आहे तरी देखील महिला याची दखल घेत नाहीत त्यामुळे असे प्रसंग घडतात व चोरट्याना मुभा मिळते. इथूनपुढे तरी महिलानीं किंमती परिधान करूनसौन्दत्ती यात्रेत येऊ नये असे आवाहन रेणुका देवी मंदिर मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कॉट्रेगस्ती यांनी केले आहे