कोरेगाव घटनेचे बेळगावात पडसाद उमटले आहेत.भीमा कोरेगाव येथें 200 वर्षाची विजयोत्सव करण्याची परंपरा असतेवेळी लाखो दलित बांधव जमलेले असताना जातीय वादी शक्ती समाज कंटकांकडून झालेल्या दगडफेकीचा निषेध बेळगावातील विविध दलित संघटनांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्या द्वारा राष्ट्रपतींना निवेदन देऊन या घटनेचा निषेध करण्यात आला.
यावेळी दलित संघटनांनी चन्नम्मा चौकात टायर पेटवून आंदोलन केले.केंद्र, महाराष्ट्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे चौकात वाहतूक बंद होती. चारी बाजूने वाहनांची रांग लागली होती. सुमारे अर्धा तास आंदोलन केले. येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर निधेष नोंदवत दाखल झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांना निवेदन दिले. व्यापक पोलिस बंदोबस्त मोर्चानिमित्त तैनात करण्यात आले होते.