आजची राशी ” मिथुन”
(राशीस्वामी- बुध)
|| श्रद्धा आणि सबुरी ठेवा || राशी वैशिष्ट्ये
मिथुन ही कालपुरुष कुंडलीतील तिसऱ्या क्रमांकाची राशी आहे. या राशीचा स्वामी बुध आहे. वायूतत्वाची द्विस्वभाव राशी असून पश्चिम दिशेवर प्रभुत्व आहे. या राशीच्या व्यक्ती फार बुद्धिमान असतात. त्यांची आकलनशक्ती , हजरजबाबीपणा, तर्कशक्ती, स्मरणशक्ती, ग्रहणक्षमता चांगली असते. मितभाषी, उत्कृष्ट वक्तृत्व,भाषाशैली उत्तम असते.
स्वभाव वैशिष्ट्ये
या राशीतील व्यक्ती थोड्या धरसोड वृत्तीच्या असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत साम्य नसते.ते पराक्रमी असतात, कामाचा उरक चांगला असतो. दुसऱ्यांची मते ते कधीच ऐकून घेत नाहीत. मित्रपरिवार मोठा असतो, या राशीच्या व्यक्तीचा बौद्धिक क्षेत्रातील व्यवसायाशी जास्त संबंध येतो. बोलण्याच्या कलेत निपुण असल्याने आशा व्यक्ती उत्तम वक्ता, प्राध्यापक, वकील, व्यापारी, कन्सल्टंट, आयकर, सेल्समन, एजंट, वृत्तसंपादक तसेच कलाक्षेत्रातही दिसून येतात.
या राशीच्या व्यक्तींना मूत्रविकार, मज्जासंस्थेचे विकार, मेंदूत बिघाड, फिट्स यासारखे विकार होऊ शकतात. या राशीच्या स्त्रिया बोलक्या असतात. पत्रिकेतील ग्रह बिघडल्यास गुन्हेगारी व फसवणुकीची प्रवृत्ती असते.
वार्षिक ग्रहमान
मिथुन राशीच्या व्यक्तींना मागच्या वर्षीपेक्षा यावर्षीचा कालखंड मनोवांछित फळे देईल. आपल्यात वैयक्तिक विकासाबरोबर मानसन्मान प्रतिष्टा देईल.
जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात वर्षारंभी आपल्या राशीच्या सप्तम स्थानात शुक्रशनी, रवीप्लुटो असून शनी शुक्र अस्थंगत स्थितीमध्ये असल्याने वैवाहिक सुखात थोडी कमतरता येईल. शुक्र जरी गोचरीने तुमच्या कुंडलीच्या सप्तमात असला तरी अस्थंगत आणि शनियुक्त आहे. त्यामुळे सप्तमातला शनी वैवाहिक सुखाचा अभाव देतो. परिणामी जोडीदाराशी थोडे मतभेद होतील. व्यापारी वर्गाला भागीदारीत अपयश देतील, परंतु हे काही काळापुरते मर्यादित आहे. याकाळात कोर्ट कचेरीची कामे योग्यरीत्या हाताळावीत, कारण जानेवारीला होणारे चंद्रग्रहण संमिश्र फळ देणारे आहे. याकाळात घाई गडबडीने घेतलेले निर्णय चुकू शकतात, काळजी घ्यावी.
फेब्रुवारी व मार्च महिना विध्यार्थी वर्गाला प्रगती पथावर नेईल, विवाहयोग्य मंडळींचे विवाह जमतील. या राशीच्या पंचमात गुरू आल्याने तो विध्येत यश व संतती बाबतीत सुख देईल. महिलांची काही अपुरी राहिलेली कामे याकाळात मार्गी लागतील. व्यवसाय क्षेत्रातील लोकांची येणी वसूल होतील. तसेच थांबलेली व अपुरी राहिलेली कामे पूर्ण होतील. या काळात व्यावसायिकांनी नोकरवर्गास चांगली वागणूक द्यावी, नाहीतर मानसिक त्रास होईल. या महिन्यातील उत्तरार्ध पूर्वार्धापेक्षा बरा राहील.
एप्रिल व मे महिना तसा चांगल्या वाईट गोष्टींचा समतोल साधेल. व्यावसायिक लोकांना एकाध्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल.कारण या राशीच्या दशमेष वक्री यायच्या स्थानापासून अष्टमात आहे. राशीचा स्वामी दशमात नीच होत आहे त्यामुळे त्याचे परिणाम व्यावसायिकांना या दोन महिन्यात मिळतील. नोकरीत असणाऱ्यांचे वरिष्ठांशी मतभेद होतील.
एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात पती पत्नीमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतील किंवा वैवाहिक जोडीदारविषयी काही चिंता निर्माण होतील. या काळात महिलांनी शांत राहावे. मे महिन्याच्या २ तारखेला मंगळ मक्रेट प्रवेश करीत असल्याने श्रद्धा व सबुरीने आपणास वागावे लागेल. जीवनात येणारे चढ व उतार पार करून सुखाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे, तेंव्हा शांत राहा.
जून व जुलै महिना विध्यार्थी वर्गाला यशाचा जाईल. शिक्षण संदर्भात दूरचे प्रवास घडतील. अभ्यासात लक्ष लागेल. काहीतरी नवीन शिकण्याची आवड निर्माण होईल. बुध हा आपल्या राशीतच येत असल्याने बौद्धिक पात्रता वाढेल. परंतु या महिन्यात आपण खर्चावर योग्य नियंत्रण ठेवावे लागेल. कुसंगतीपासून विध्यार्थी वर्गाने दूर राहावे. या राशीच्या महिलांना या काळात नवीन व्यवसायाची संधी येईल नवनवीन कलागुण दाखवण्याची संधी मिळेल, परंतु या महिन्याच्या २७-२८ ला होणारे खग्रास चंद्रग्रहण अशुभ आहे त्यामुळे या राशीच्या गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहू नये. तसेच या राशीच्या व्यक्तींनी धार्मिक कार्य, जपजाप्य दैनंदिन पूजा करावी त्यामुळे त्याचे अशुभ परिणाम आपल्यावर होणार नाहीत. जुलै उत्तरार्धात सर्वसाधारण राहील.
ऑगस्ट सप्टेंबर हा काळ पैशाची आवक वाढवेल. हे दोन महिने आर्थिक बाबतीत अनुकूल आहेत परंतु या काळात धार्मिक गोष्टींकरिता खर्च कराल, आपल्या राशीचौ अष्टमस्थानी मंगळ केतू हे ग्रह येत असल्याने या राशीच्या लोकांना या काळात दिर्घमुदतीचे आजार होणे, प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील तसेच अपघात योग्य अथवा नको त्या मार्गाने पैसे मिळवण्याचे लोभ निर्माण होतील, त्यामुळे अशा गोष्टींपासून सावध राहावे. खर्चात वाढ होईल, महिलांनी व तरुणांनी या काळात स्व खर्चावर नियंत्रण ठेवावे.
ऑक्टोबर नोव्हेंबर हा महिना प्रकृतीत सुधारणा करवेल , मधुमेह असणाऱ्यांनी मात्र याकाळात खाण्या पिण्याचे पथ्य पाळावे.काही महत्वाचे
# मिथुन राशीतील नक्षत्रे: मृग, आर्द्रा, पुनर्वसू
# मृग स्वभाव : धार्मिक , उत्साही, नाम अक्षर :का, की
# आर्द्रा स्वभाव :चंचल, बलशाली नाम अक्षर : कु, घ, गं, छा
# पुनर्वसू स्वभाव : सरळ मनाचे विद्वान नाम अक्षर : के, को, हा
उपासना
# मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी बुधवारी पांढरे पूर्ण तांदूळ दान करावे. तसेच गणेशाचे पूजन करावे.
# आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी काळ्या गाईला गुळ व हरभरा दान करावे. शनी किंवा मारुतीला तीळेल तेलाचे दिवे लावावे
#पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी उडीद व तिळाचे दिवे दान करावे तसेच दत्त पादुकावर भिजलेली हरभरा डाळ व गुल वहावा, दत्तदर्शन घ्यावे.
* महिलांनी कुंजीका स्तोत्राचा पाठ करावा, दत्तबावनी वाचावी
* विध्यार्थीवर्गाने विष्णू सहस्त्र नाम व व्यंकटेश स्तोत्र यश मिळेल.
* वयस्कर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जप करावा.
# भाग्यरत्न राशीप्रमाणे पाचू
कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार रत्न धारण करावे. त्यासाठी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
अंकशास्त्रानुसार ६ अंक शुक्राचा आहे.
# शुभवार : रविवार,बुधवार, गुरुवार
# शुभमहिने : ऑगस्ट, ऑक्टोबर, फेब्रुवारी
#रंग : पांढरा, आकाशी,
( भाग्योदय वयाच्या २३ ते ४१ या काळात होईल)
श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय
सौ. उषा सुभेदार, ज्योतिषी-
padmamba,घर क्रं २०१६,बी -२ कोरे गल्ली शहापूर
बेळगाव -५९०००३.- फोन ०८३१-२४६४६३६
मोबा. ८७६२६ ५५७९२- ८६१८०७३३२८