नवीन वर्षात नवे काही करणारी मंडळी अनेक आहेत. गोरगरिबांना घरी फ्रीज घेता येत नाही ही गरज ओळखून अशाच फूड बॉक्स ची संकल्पना पुढे आली असून टिळकवाडी पहिले गेट येथील कला मंदिर समोर पुरोहित सिलिब्रेशन्स मध्ये तो सुरू करण्यात आला आहे.
टिळकवाडीचे सीपीआय एम एन देशनूर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
हा फूड बॉक्स म्हणजे एक फ्रीज आहे. ज्यात गरीब लोक आपल्याकडे उरणारे अन्न, फळे, भाज्या आणून ठेऊ शकतात, उरणार अन्न खराब होऊ नव्हे म्हणून हा उपक्रम आहे. आपल्याला हवे असेल तेंव्हा येथे ठेवलेल्या वस्तू घेऊन जाता येतील.
सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत हा फूड बॉक्स खुला राहील. साधारणपणे शाकाहारी पदार्थ ठेवावेत आणि ते कधीपर्यंत टिकतील तितकाच काळ ठेवावेत इतकाच नियम आहे.