आजची राशी ” वृषभ”
(राशीस्वामी- शुक्र)
|| यशस्वी कालखंड ||
राशी वैशिष्ट्ये
वृषभ ही कालपुरुष कुंडलीतील दुसऱ्या क्रमांकाची राशी आहे. या राशीचा अंमल मुख्यत्वेकरून मान, घसा, मुख,कंठ व नेत्रावर असतो.ही स्थिर व पृथ्वीतत्वाची राशी असून सम राशी असल्याने सौम्य आहे. राशी स्वामी शुक्र असल्याने या राशीच्या व्यक्तींमध्ये स्त्री तत्वाचे गुणधर्म आढळतात. उत्साही, समजूतदार, शांत, लाजाळू, दिर्घोद्योगी, काम करण्याची धम्मक असते. सहनशील, आशावादी तसेच कुटुंबाची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडणाऱ्या असतात. तसेच पिलासी, रसिक, आधुनिक राहणीमानाच्या, आकर्षक व्यक्तिमत्वाच्या हसतमुख व व्यवहार ज्ञानाने परिपूर्ण व्यक्ती आढळतात.
स्वभाव वैशिष्ट्ये
स्वामित्व दक्षिणेला असते, ही पृथ्वीतत्वाची स्थिर रास असल्याने एक ठिकाणी स्थिर राहणे यांना आवडते. विशेष करून स्थिर व्यवसायात हे लोक असतात. शेतीसारखे व्यवसाय, फुलांची शेती तसेच सौन्दर्य क्षेत्राशी संबंधीत नोकरी व्यवसाय, कला, नाट्य, वस्त्रोद्योग, रंगकाम या क्षेत्रात हे लोक विशेष दिसून येतात. विपरीत परिस्थिती असली तरी सतत हसतमुख असतात. या राशीच्या व्यक्तींना विशेष करून गळ्याचे, मानेचे विकार, अन्न व श्वास नलिके संबंधींचे विकार आणि टॉन्सिल, घटसर्प, गंडमाळ, घशात कफ साचणे, मानेच्या मणक्यासंबंधी आजार उद्भवतात.
वार्षिक ग्रहमान
वृषभ राशीच्या व्यक्तींना मागच्या वर्षीपेक्षा यावर्षीचा कालखंड यशाचा जाईल. कर्तव्यपूर्तीचा आनंद आपण यावर्षात उपभोगाल. भाग्य पुरेपूर साथ देईल. यावर्षी मनासारखा पैसे आपल्या हाती खेळेल. लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर होईल.पण या आनंदात प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण वर्षाची सुरुवात आपल्याला आर्थिक बाबतीत अनुकूल असलीतरी ३१ जानेवारीला होणारे ग्रहण प्रकृतीची काळजी घेण्यास सांगते. कारण कर्क राशीत होणारे हे ग्रहण आपणास हितकारक नाही तसेच वर्षाच्या सुरुवातीच्या काळात विशाखा नक्षत्रात तुला राशीतील मंगळ- गुरू योग षष्ठ स्थानात होत असल्याने पोटाच्या तक्रारी वाढतील त्यामुळे याकाळात प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
फेब्रुवारी व मार्च महिना हा आपणास नवीन व्यवसायात पदार्पण करण्यास चांगला आहे. याकाळात आर्थिक उलाढाली चांगल्या मोठ्या प्रमाणात होतील. महिलावर्ग दागिन्यांची हौस पुरवण्यात यशस्वी होतील. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. विध्यार्थी शिक्षण क्षेत्रात यश संपादन करतील. मार्च अखेरच्या कालखंडात थोडी पैशांची चणचण भासेल, पण काळजी करण्याची गरज नाही.
एप्रिल व मे महिन्यात आपली पैशांची उणीव भरून निघेल, हे दोन्ही महिने आपल्याला तसे बरे जातील. जगातील आर्थिक चढऊताराचा फटका आपणास बसत असला तरी त्याची खळगी आपण योग्य रीतीने भरून काढाल, परंतु याकाळात घरातील वयस्कर व्यक्तींच्या विरोधाला सामोरे जावे लागेल. वडीलधाऱ्या व्यक्तींशी विरोध निर्माण होऊ शकतो. आपण योग्य रीतीने परिस्थिती हाताळाल. वृषभ रास असलेल्या स्त्रियांनी गप्प बसणे योग्य ठरेल.
जून व जुलै महिना हा स्त्रीवर्गाला व विध्यार्थ्यांना विशेष लाभदायक राहणार आहे. याकाळात काहीतरी विशेष केल्याचा आनंद राहील. नवीन कल्पना सुचतील व अंमलात आणल्या जातील.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आपणास प्रवास योग आहेत.आपल्या परिवारासाठी विशेष वेळ काढाल, महिला वर्ग धार्मिक कार्यात भाग घेईल. तसेच विध्यार्थी वर्गाला मित्रांकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिकांना गुंतवणुकीत लाभ होतील.
ऑक्टोबर, नोव्हेंबर महिना व्यापारी वर्गाला विशेष धनप्राप्तीकारक व स्थैर्य देणारा राहील. पैशाची आवक चांगली राहील.सप्तमस्य गुरू भ्रमणाची सुरुवात ऑक्टोबर महिन्यात होत असल्याने त्याचे परिणाम सुरुवातीपासून दिसू लागतील. कोर्ट, कचेरी कामात यश लाभेल. जमीन जुमला, खरेदी विक्रीचे मोठे व्यवहार यशस्वी होतील. परंतु याकाळात महीलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. कामा मुळे महिलांना आपल्या कुटुंबाला वेळ देता येणार नाही.त्यामुळे चिडचिड वाढेल.
वर्षाचा अखेर म्हणजेच डिसेंबर महिना उत्तम जाईल. प्रापंचिक सौख्य मिळेल. जबाबदारी वाढेल. व्यापारात प्राप्ती चांगली राहील.कामाचा व्याप वाढला तरी आवक वाढेल पण त्यामुळे शारीरिक पीडा जाणवेल. धंद्यातील धाडसी निर्णय यशदायी होतील.आपल्या निर्णयाला योग्य समर्थन राहील.देवी देवतांच्या दर्शनासाठी प्रवास घडेल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. उपवर मंडळींचे विवाह जमतील. विध्यार्थी वर्गाला मित्र सहकार्यातून एखादे यश मिळेल. वयस्कर व्यक्तींना कुटुंबसौख्याचा लाभ होईल.
काही महत्वाचे
# मेष राशीतील नक्षत्रे: कृतिका, रोहिणी, मृग
# कृतिका स्वभाव : विध्यानिपुण , चतुर, नाम अक्षर : आ, इ, उ, ए
# रोहिणी स्वभाव : शांत, प्रसन्न, दिर्घोद्योगी नाम अक्षर : ओ, वा, वी
# मृग स्वभाव : चंचल, विवेकी नाम अक्षर : वे, वो, का, की
उपासना
# कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींनी सुवर्णदान किंवा सुवर्णवर्णाच्या वस्तूंचे दान करावे. तसेच दत्ताला नमस्कार करून महत्वाच्या कामास जावे.
# रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींनी दुग्धजन्य पदार्थ किंवा दूध दान करावे. महत्वाच्या कमला जाताना जांभळाच्या झाडाला दूध अर्पण करावे व नागस्तोत्राचा पाठ करून जावे यश मिळेल.
#मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी तांदळाची खीर पौर्णिमेला दान करावी किंवा चंद्राला नैवेध्य दाखवून ग्रहण करावी. तसेच दर पौर्णिमेला चंद्राला अर्घ्य द्यावे. चांदीच्या नागाचे पूजन करावे यश येईल.
* पुरुषांनी दत्ताची सेवा करावी
* महिलांनी कुंजीका स्तोत्राचा पाठ करावा, कुटुंबात शांतता लाभेल
* विध्यार्थीवर्गाने प्रज्ञापिवर्धन स्तोत्राचा पाठ करावा परीक्षेत यश मिळेल.
* वयस्कर व्यक्तींनी शंकराची उपासना करावी
# भाग्यरत्न राशीप्रमाणे हिरा
कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार रत्न धारण करावे. त्यासाठी योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
अंकशास्त्रानुसार ६ अंक शुक्राचा आहे.
# शुभवार : गुरुवार, शुक्रवार
# शुभमहिने : जानेवारी, फेब्रुवारी, जुलै
#रंग : गुलाबी, आकाशी, चॉकलेटी
( भाग्योदय वयाच्या चोवीस वर्षांपासून)
श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय
सौ. उषा सुभेदार, ज्योतिषी
padmamba,घर क्रं २०१६,बी -२ कोरे गल्ली शहापूर
बेळगाव -५९०००३.- फोन ०८३१-२४६४६३६
मोबा. ८७६२६ ५५७९२- ८६१८०७३३२८