बेळगाव तालुका पंचायत कार्यालयातील फलक मराठीत लिहा अशी मराठी तालुक्यातील मराठी सदस्यांनी केली आहे . तालुका पंचायतीचे मुख्य कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी वरील मागणी केली आहे.
गेल्या काही वर्षात तालुका पंचायतीत मराठीतील फलक गायब झाले असून त्या ठिकाणी फक्त कन्नड भाषेत फलक लिहिण्यात आले आहे याचा त्रास मराठी सदस्यांना होत आहे .
बेळगावात बहू संख्य मराठी भाषिक असून देखील भाषिक अल्पसंख्यांक कायद्यांची पायमल्ली केली जात आहे त्यामुळे कार्यालयातील नामावळ कन्नड बरोबर मराठीत देखील लिहा अशी मागणी करण्यात आली आहे . तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर रावजी पाटील अप्पासाहेब कीर्तने नारायण कदम नारायण नलावडे काशिनाथ धर्मोजी नीरा काकतकर मथुरा तेरसे वासनात सुतार मनीषा पालेकर आदी उपस्थित होते