उत्तर पूर्व पोलीस गुलबर्गा विभाग महा निरीक्षक अलोक कुमार यांची उत्तर विभाग पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे आय जी पी रामचंद्र राव यांची बढती निमित्य बदली करण्यात आली आहे त्यामुळे बेळगावचे प्रभारी पोलीस आयुक्त म्हणून देखील अलोक कुमार कार्यभार सांभाळण्याची शक्यता आहे.
अलोक कुमार हे १९९४ बच चे आय पी एस अधिकारी आहेत. राज्यातील ३० आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या करण्याचे आदेश राज्य सरकारने बजावले आहेत .
संदीप पाटील बनले डी आय जी
राज्य गुप्तचर खात्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचं देखील प्रमोशन झाल असून त्यांची डी आय जी पदी वर्णी लागली आहे नवीन आदेश येई पर्यंत पाटील यांना राज्य रिजर्व्ह पोलीस दलाचे डी आय जी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. संदीप पाटील हे २००४ चे आय पी एस अधिकारी असून त्यांनी बेळगाव हून बदली झाल्यावर बंगळूरू डी सी पी दक्षिण , सेंट्रल म्हणून सेवा बजावली आहे.