नवं वर्षाच स्वागत साठी ओल्ड मॅन जाळून केलं जातं,31 डिसेंबर च्या रात्री 12 वाजता जाळण्यासाठी ओल्ड प्रतिकृती बनवण्याचे विक्रीचे काम बेळगावातील कॅम्प जोरात सुरू आहे.
नववर्षाच्या स्वागताची तयारी बेळगावमध्ये सुरु झाली असून बेळगाव शाहरातल्या कॅम्प भागात ओल्डमनवर शेवटचा हात फिरविण्याचे काम सुरू आहे.
दरवर्षी ३१ डिसेम्बरला ओल्डमन दहन करण्याची परंपरा आहे . ओल्डमन कोणाचा अधिक उंच हा देखील ईर्षेचा विषय कॅम्प या विभागात ठरतो . तयार ओल्डमन कॅम्प मध्ये विकण्यासाठी उपलब्ध आहेत . अमित कांबळे यान अणि याच्या परिवारांन वेगवेगळ्या आकाराचे ओल्डमन तयार केले आहेत . दिडशे रुपये सुरू होऊन पाचशे ते पाच हजार रु . इतका ओल्डमनचा दर आहे . त्याच्या उंचीवर दर ठरतो . गोव्यासह अनेक सावंतवाड़ी पर्यंत इथुनच ओल्ड मन खरेदी केले जातात.बेळगावात तयार होणारे ओल्ड मॅन प्रतिकृती त्याची कोंकण गोव्यात होणारी विक्री यामुळे बेळगाव शहरावर टिपिकल कोंकणी संस्कृतीची छाप आहे हे देखील सिद्ध होते.