बेळगाव मधील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आणि जे.एल.विंग येथे गेल्या चौदा दिवसापासून सुरु असलेल्या भारत मालदीव संयुक्त लष्करी कवायतीची सांगता झाली. समारोप प्रसंगी वरिष्ठ निरीक्षक म्हणून ब्रिगेडियर जनरल अली जुहेर उपस्थित होते.
संयुक्त लष्करी कवायतीमुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.मराठा सेंटर,जे.एल. विंगमध्ये उत्कृष्ट पायाभूत सुविधा आहेत.एकमेकांची बलस्थाने संयुक्त कवायतीमुळे समजली असे ब्रिगेडियर जनरल अली जुहेर म्हणाले.बेळगावच हवामान जंगल आणि मराठा सेंटर जुनियर लीडर्स विंग मधल्या मुलभूत सुविधा या संयुक्त सरावास उपयुक्त असून मराठा सेंटर च्या अधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य दिल असल्याची भावना देखील अली जुहेर यांनी बोलून दाखवली.
संयुक्त लष्करी कवायतीच्या सांगता प्रसंगी भारत आणि मालदीवच्या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या जवानाकडून मालदीवचे ब्रिगेडियर जनरल अली जुहेर आणि भारताचे ब्रिगेडियर अलोक खुराना यांनी मानवंदना स्वीकारली.यावेळी भारतीय आणि मालदीव ध्वज घेऊन आकाशातून जाणाऱ्या हेलिकॉप्टरनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.सिरमुर रायफल्सच्या पाईप आणि ड्रम बँडने सुरेल वादन केले.कार्यक्रमाला अधिकारी,जवान उपस्थित होते. वेगवेळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाने या एकुवेरीयन दोन्ही देशातील आठव्या संयुक्त लष्करी कवयातींची सांगता झाली.