विधानसभा निवडणूका तीन ते चार महिन्यावर येऊन ठेपलेत, राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार निश्चित होत आहेत, त्यांच्या इच्छूकांनी मतदार याद्या पडताळणे, मतदार यादीतून रद्द झालेली नावे पुन्हा घालणे तसेच नवीन मतदारांची नावे यादीत घालून घेण्याचे काम सुरू केले आहे. असे असताना मध्यवर्ती समिती आणि घटक समित्या अजूनही झोपेतच आहेत.
दीड वर्षापूर्वी रिक्त असलेल्या मध्यवर्ती च्या अध्यक्ष पदावरती दीपकराव दळवी ह्यांची निवड झाली.त्यावेळी सर्व घटक समित्याना एकत्र करून हि निवड झाली नाही अशी टीका सुरू होती.पण दीपक दळवी हे सीमाप्रश्नसम्बन्धी अभ्यासू आणि कुशल असे समितिचे नेते असल्यामुळे ते सर्वांची मने जिंकतील आणि समितीला नवी बळकटी मिळवून देतील अशी माफक अपेक्षा सर्व कार्यकर्त्यांनी बाळगली होती, पण त्यांच्या निवडीपासुन आता पर्यत तरी हि अपेक्षा फोल ठरली आहे असेच म्हणावे लागेल.
महाराष्ट्र एकीकरण समिति हि सीमाप्रश्न बद्दल बांधील आहे हि काळ्या दगडावरची रेष आहे ह्यात काही दुमत नाही त्यामुळे रस्त्यावरची लढाई जिवंत ठेवण्यासाठी आतपर्यंतच्या निवडणुका लढवून सीमाभाग हा महाराष्ट्र चा अविभाज्य भाग आहे हे वेळोवेळी सिद्द केलेलं आहे.
सध्या कर्नाटकात तीन ते चार महिन्यात निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यासाठी सर्वच राष्ट्रीय पक्षांनी एक वर्षापूर्वी पासुनच समितीला घेरण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. त्यामुळे समितिचे प्रामाणिक कार्यकर्ते अध्यक्षांच्या निर्णयांची वाट बघत आहेत.
मध्यंतरी समिति मधून बरेच कार्यकर्ते राष्ट्रीय पक्षांच्या गळाला लागले त्यावेळी त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी ह्या नेत्यांची होती पण तिकडे सपशेल दुर्लक्ष झाले त्यामुळे समिति मधे स्मशान शांतता आहे आणि ह्या ना अशा अनेक प्रकारामुळे समितीचे वरिष्ठ नेते झोपलेत की झोपेचे सोंग घेतलेत अशी शंका निर्माण होत आहे.
बेळगाव शहर, तालुका आणि खानापूर तालुका घटक समिती नेतेही म्हणावे तितक्या तयारीत नाहीत. खानापूर तालुक्यात काही प्रमाणात काम सुरू आहे, ते सोडता बाकीचे राष्ट्रीय पक्षांचे पैसे खाण्यात मग्न आहेत. पक्षांचे उमेदवार सोशल मीडियाचा वापर करून व्होटबँक मजबूत करत आहेत….. समिती नेते आणि इच्छूकांनी आता तरी झोपेतून उठावे ही सामान्य माणसाची इच्छा आहे.
Trending Now