कचरा पडलेली हद्द महानगरपालिकेची की कॅन्टोन्मेंटची हे निश्चित न झाल्यामुळे कचऱ्याची उचल झाली नाही यामुळे बेळगाव शहरातील आर टी ओ सर्कल समोरील परिसरात दुर्गंधी पसरली आहे. बेळगाव शहर स्मार्ट होणार असा दावा करणाऱ्या महापालिका आणि स्वच्छतेत अव्वल कामगिरी बजावलेल्या आणि केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचा पुरस्कार मिळवणाऱ्या कॅटोन्मेंट बोर्डाने कचरा उचलला नाही.या दोन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वादात मात्र कचरा आहे तिथेच पडून असून रोज कचऱ्याच्या ढिगात वाढ होत आहे.
शहरातील आर टी सर्कल समोरील बस स्थानक कडे जाणाऱ्या रस्त्यावर कागद कचरा जाळल्याने इथली उचल न झाल्याने कचरा कुशल आहे या भागात दुर्गंधी पसरल्याने येथून ये जा करणार्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे .
नागरिकांच्या आरोग्याचा कचऱ्याचा ढीग साठल्यामुळे धोका उदभवु शकतो याची जाणीव तरी अधिकारी आणि लोक प्रतिनिधींना होणे आवश्यक आहे.