बेळगाव शहरातील सदाशिवनगर येथे दरोडा घालून 3 लाख 66 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडलीआहे .पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दरोडेखोरांनी या दरम्यान घरातील महिलेच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून बांधले. यानंतर महिलेच्या गळ्यातील दागिने, तिजोरीतील दागिने लुटले आहेत .
सदाशिवनगर दुसरा क्रॉस येथील सारिका सागर पाटील यांच्या मालकीचे घर असून, घरात सोमवारी सायंकाळी एकट्या होत्या. दरवाजा उघडा होता. यादरम्यान दरोडेखोर अचानक घरात घुसले आणि सारिका यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि नंतर त्यांना बांधले. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि तिजोरोतील दागिने रोकड काढून घेतलीआणि पलायन केलं पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेतली. रात्री उशीरा प्रकरण दाखल करण्यात आले आहे पोलीस पुढील तपास करत आहेत
अलीकडे शहरात चोरी दरोड्यांचा संख्येत लक्षणीय वाढ झाली असून पोलिसांनी गस्त वाढवावी अश्या चोऱ्या दरोड्यावर नियंत्रण आणावे अशी मागणी केली जात आहे