बेळगावा महा पालिकेच्या अनेक समस्यांची मागणीची पूर्तता करण्यासाठी महा पालिकेच्या शिष्टमंडळाने नगर विकास खात्याचे सचिव अंजुम परवेज यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगार पालिके एवजी नगर विकास खात्याच्या वतीने देण्यात यावा कित्येक वर्षा पासून रिक्त असलेली कौन्सिल सेक्रेटरी,आरोग्याधिकारी सह अनेक रिक्त पद भरण्यात यावीत तसेच शहरातील सरकारी खुल्या जागात शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवण्यात यावेत यासाठी राज्य सरकारने तत्काळ मंजुरी ध्यावी अशी मागणी करत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मराठा मंदिर जवळील जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवण्यास त्वरित अनुमती ध्यावी अशी देखील मागणी परवेज यांच्याकडे करण्यात आली आहे .
खुल्या जागात शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवण्यास मंजुरी आणि रिक्त पद भरण्याच परवेज यांनी आश्वासन दिल असल्याची माहिती मिळाली आहे तसेच जानेवारीच्या पाहिया आठवड्यात अंजुम परवेझ बेळगावला येऊन पालिकेची विकास आढावा बैठक घेणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे. विधान सभा निवडणुका अगोदर पालिका निवडणुका घेतल्यास या कार्यकाळात असलेल्या नगरसेवकांच एक वारशाच अवधीच नुकसान होऊ शकत त्यामुळे अवधी पूर्ण करण्यास संधी ध्यावी असा देखील गाऱ्हाण परवेझ यांच्याकडे मांडण्यात आल आहे. या शिष्टमंडळात विरोधी पक्ष नेते दीपक जमखंडी ,जेष्ठ नगरसेवक किरण सायनाक, रमेश सोनटक्की, रतन मासेकर,भैरू गौडा पाटील ,रमेश कळसंन्नावरयांचा समावेश होता.
it’s feels immense pleasure that anjum parvez sir is coming to belgaum it’s my humble request to look into the matter of officers who are making missuse of janahitha application and intentionally delaying the complaint with corrupt motive