मागील शुक्रवारी प्रदर्शित झालेला सलमान कतरिना अभिनित बिगबजेट चित्रपट टायगर जिंदा है ला बेळगाव मध्ये हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळतोय. आज मंगळवारीही या चित्रपटासाठी प्रकाश चित्रपटगृहाने मोठी गर्दी खेचली आहे.
शुक्रवारपासून प्रत्येक शो फुल्ल आहे. सलमान आणि कतरिना या जोडीने धमाल केली आहे. एक था टायगर चित्रपटाचा पुढील भाग असलेला हा चित्रपट रहस्यपटाच्या मालिकेत एक मैलाचा दगड ठरणारा आहे.
हा चित्रपट पाहून प्रेक्षक खुश होऊन जात आहेत. त्यातच प्रकाश च्या नव्या आधुनिक प्रोजेक्षन मध्ये या चित्रपटाची जादू कमालीची आहे.