Thursday, December 26, 2024

/

मध्यवर्ती समितीच्या वतीने सकाळचे मुगळी पुढारीच्या गावडा यांचा सत्कार

 belgaum

gawada gopal बेळगाव सकाळ आवृत्ती प्रमूख पदी पत्रकार मल्लीकार्जून मुगळी तसेच पुढारी बेळगाव निवासी संपादक पदी पत्रकार गोपाळ गावडा यांची नियुक्ती झाल्याबद्दल मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पुढील कार्यास शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.

अनेक वर्षापासून बेळगावमधे पत्रकारीतेचा उत्तम ठसा निर्माण करत या दोन व्यक्तीनीं आपल्या लेखनीने सीमाप्रश्न दिलेले योगदान ,याभागात असणारी बहुभाषक मराठी जनता,शेतकरी तसेच इतर भाषक जनतेला शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी जाणिवपूर्वक प्रामाणिकपणे नाव कमावले त्यामुळेच त्यांची  सकाळ व पुढारी वृत्तपत्र संपादकांनी बेळगाव आवृत्ती प्रमुख पदी बढती दिल्याने येथील मराठी जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .त्यानिमित्त मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव तर्फे त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देत आजपर्यंत सीमाप्रश्नी लढणाऱ्या जनतेच्या भावनां वृत्तपत्रातून मांडत जनतेच्या तनामनांत मानाचे स्थान निर्माण केलात तसेच यापूढेही सीमाप्रश्नी न्याय मीळेपर्यंत अखंडीत प्रयत्न करत राहा पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे रहात जनतेत आपले स्थान पुन्हा भक्कम आहे हे दाखवून देत आपल्या सहकारी पत्रकार बंधूसमवेत प्रयत्नांची पराकाष्टा करत रहाव म्हणून भरभरुन शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी मध्यवर्ती म ए समिती कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर,सरचिटणीस मालोजी अष्टेकर,खजिनदार प्रकाश मरगाळे,सदस्य राजू मरवे,विकास कलघटगी,ए पी एम सी सदस्य महेश जुवेकर,दत्ता उघाडे,एल डी बेळगावकर,अनिल हेगडे,राजू ओऊळकर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.