खासदार आमदार का दंगलग्रस्त भागात का फिरतात? राजकीय लोकच धार्मिक भावना भडकावत आहेत का? हे प्रश्न पत्रकारांनी विचारले आणि आमदार फिरोज सेठ यांचा तोल सुटला. ते पत्रकारांवर इतके भडकले की आजूबाजूच्यांना त्यांना आवरावे लागले.
बेळगावातील दंगली च्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत हा प्रकार झाला. पोलीस आयुक्त,उपयुक्त तसेच पालकमंत्री या परिषदेत होते. माहिती देऊन झाल्यावर पत्रकारांनी वर्मावर बोट ठेवणारे ते प्रश्न विचारले अन आमदारांना आपला तोल सावरता आला नाही.
तुम्ही असा प्रश्न विचारलातच कसा? असा प्रश्न त्यांनी केला. तुम्ही असे प्रश्न विचारून आरोप करायला माझे काय वरिष्ठ नाही. दंगल झाल्यावर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जाऊ नये की काय? आग आम्ही लावलोय काय? असे प्रश्न ते विचारत होते.
तुम्ही आरोप करून प्रश्न विचारला तर मीही आरोप करणार असे म्हणत त्यांनी जोरदार आवाज चढवला. बाकीच्यांनी त्यांना शांत केले.
विचारलेले प्रश्न मनाला बोचले की आमदार बीपी ची गोळी घेण्यास विसरले असे उपप्रश्न पत्रकारांना पडले आहेत.