Monday, December 23, 2024

/

दंगा करणाऱ्यांची गय नाही -रमेश जारकीहोळी

 belgaum

दंगा करणाऱ्यांची कोणत्याही स्थितीत गय केली जाणार नाही शांतता बिगडवनाऱ्यावर सख्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत अशी माहिती पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली आहे.

 

सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी एस जिया उल्ला डी सी पी सीमा लाटकर,आमदार फिरोज सेठ उपस्थित होते. खडक गल्ली जालगार गल्ली पदगडफेक जाळपोळ प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी काही कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. शांतता प्रस्थापित करण्यास कुणी ज आडवा येत असेल तर जिल्हा प्रशासन त्यांना सोडणार नाही पोलिसांना तसे आदेश दिले आहेत अस देखील त्यांनी स्पष्ट केल.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दगडफेकीचे प्रकार जास्त होत असल्याने या भागात हायमास्ट आणि सी सी टी व्ही बसवण्याचे आदेश दिले आहेत. दंगल केलेले बेळगाव बाहेर फरारी झाले आहेत अशी माहिती गुप्तचर खात्या कडून संग्रहित करण्यात आलेली आहे मुद्दाम हून काही जण शांतता भंग करण्याचा प्रयत्न करताहेत असही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.