सर्पमित्र बसवराज हिरेमठ यांनी रविवारी दोन घोणस सापांना वाचवून त्यांची सुटका केली आहे.
कल्लेहोळ येथे हे दोन सर्प गवताच्या गंजीमध्ये सापडले होते. त्यांना वाचवण्यात आले.
बेळगाव पुणे महामार्गावर अरण्य विभागात त्यांना सोडून देण्यात आले.
बसवराज हे ठिकठिकाणी मदत करण्यास धावा धाव करतात. त्यांनी अनेक व्यक्ती व प्राण्यांना वाचवले आहे. कोठेही मदत लागल्यास 9922899500 या क्रमांकावर संपर्क साधावा.
सर्प मित्र आनंद चिट्टी यांच्या नंतर बेळगावात देखील हळूहळू अनेक सर्प मित्र तयार होताहेत