बेळगुंदी येथील साहित्य सम्मेलनात भाजपचे आमदार संजय पाटील यांची उपस्थिती वादग्रस्थ ठरलेली असतानाच पुन्हा सांबरा येथील मायमराठी साहित्य संघाच्या सम्मेलनातही राजकीय फड असेच वातावरण पाहायला मिळाले.
नुकतेच समिती सोडून भाजप मध्ये गेलेले शिवाजी सुंठकर,येळ्ळूर काँग्रेस जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल आणि काँग्रेसचेच जयराज हलगेकर यांची उपस्थिती या सम्मेलनात होती. सुंठकर हे समिती सोडुन जाण्यापूर्वी पासूनच या सम्मेलनाला जातात. मात्र आता समिती सोडल्यानंतर त्यांना किती स्थान द्यायचे हे सम्मेलनाच्या आयोजकांना तरी कळायला पाहिजे होते. सम्मेलनात जेवण देण्यासाठी यांना राष्ट्रीय पक्षाच्या माणसांचा पैसा चालतोय हे त्यांचे खरे रूप आता समाजाला दिसले आहे.
मराठी संस्कृती, संवर्धन करून मराठी माणसाला अपमान वागणूक देणाऱ्यांचा निषेध हे साहित्य सम्मेलनाचे उद्दिष्ट आहे. मात्र आयोजक पैशासाठी कसे आणि किती लाचार होतात हेच पूर्वी बेळगुंदी आणि आता सांबऱ्यात दिसले.
सांबरा सम्मेलनाचे आयोजक दिलीप चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगताना राष्ट्रीय पक्ष वाले आले तर आम्हि कसे आडवू शकतो अशी हतबल प्रतिक्रिया दिली होती, मात्र यामागे त्यांची हतबलता नसून पैसे जमवण्याचा डाव समोर आलाय.