घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची त्यात भर पावसात घर कोसळलं अश्या कठीण स्थितीतील एकास शासकीय योजनेतून घर मंजूर करण्यास मराठी युवा मंच संघटनेने हातभार लावला त्यातून थोड थोड काम करत त्यांनी घरच काम निर्माण पूर्ण केल.
नागेंद्र भैरू धर्मोजी चावडी गल्ली सांबरा अस पाच वर्ष लागू शेवटी घर बांधलेल्या इसमाच नाव आहे. २०१२ मध्ये त्याचं जून घर पावसात कोसळलं नवीन घर बांधायची ऐपत नव्हती शेवटी मराठी युवा मंच मदत केली होती. २६ मे २०१२ साली मराठी युवा मंचने सांबरा ग्रामपंचायतीला घेराव घालून त्या गरीब कुटुबीयाना घर बांधून मदत देण्याची मागणी केली होती.
त्या नंतर २०१४ मध्ये बसव योजनेतून एक लाख २० मंजूर झाले त्या नंतर जमेल तसे पैसे खर्च करून त्यांची वास्तू आज पूर्ण झाली त्यामुळे या कार्यास मदत केलेल्या पंचायत क्लार्क परशराम मल्लाप्पा सनदी यांचा सत्कार मंच च्या वतीने करण्यात आला आहे. नारायण किटवाडकर,सूरज कणबरकर.द्वारकानाथ उरणकर,सतिश गावडोजी ,सुधिर कालकुंद्रिकर सांबरा येथील नारायण अष्टेकर आदि यावेळी उपस्थित होते.