महाराष्ट्रात भाजप सोबत युतीत असलेली शिवसेना संपूर्ण कर्नाटकात भाजपच्या विरोधात शिवसेना निवडणूक लढवण्याची चाचपणी करत आहे. श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी याबाबत शिव सेना नेत्यांशी चर्चा सुरु केली आहे.
मे २०१८ मध्ये कर्नाटकात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत शिव सेनेची एंट्री होऊ शकते का याबाबत चर्चा करण्यासाठी प्रमोद मुतालिक मुंबईला रवाना झाले आहेत. याच विषयावर शिव सेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्याशी चर्चा केली आहे रविवारी दुपारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार असून या बैठकीत मुतालिक शिवसेनेत प्रवेश करणार का याबाबत सर्व काही स्पष्ट होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शिवसेना राम सेनेच्या मदतीने कर्नाटकात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एंट्री मारणार असून बेळगाव विजापूर हुबळी चिकमंगळूर अश्या ठिकाणच्या १०० जागांवर निवडणूक लढवू शकते याची तयारी मुतालिक यांनी केली आहे. स्वत प्रमोद मुतालिक चिकमंगळूर मधून लढवू शकतात. शिव सेना जर कर्नाटक विधान सभा लढली तर हिंदुत्व वादी मतदारावर प्रभाव असलेल्या मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढण्याची देखील शक्यता आहे.
बेळगाव सह मराठी बहुल मतदार संघात शिव सेनेची भूमिका काय ? महाराष्ट्र एकीकरण समितीच्य विरोधात उमेदवार देणार काय ? बेळगाव उत्तर दक्षिण खानापूर सोडून इतर मतदार संघासाठी राम सेना शिवसेनेत विलीन होणार का ? याबबत देखील रविवार च्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.