शिक्षणमहर्षी गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवार दि २४ रोजी सकाळी १० वाजता हब्बनहट्टी येथे होणार आहे.
कॉम्रेड कृष्णा मेनसे, कामगार मंत्री संतोष लाड,गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे,आमदार अरविंद पाटील, संभाजी पाटील, अंजलीताई निंबाळकर, राजश्री नागराजू, वाय बी चौगुले हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.गौरव गाथा या स्मरणिकेचे प्रकाशनही होणार आहे.
माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांचा अल्पपरिचय
जन्म ७ आगष्ट १९३० येळ्ळूर गावात
वडील भरमाजी आई निंगुबाई
१९५७ साली विश्व भारत सेवा समितीची स्थापना , शिवाजी विद्यालय येळ्ळूर हि पहिली शाळा ,
१९६७ ते १९७२ साली आमदार पद
साराबंदी गोवा मुक्ती सीमा प्रश्न आंदोलनात सहभाग
शिक्षण संस्थेच्या आज खानापूर हुक्केरी आणि बेळगाव चंदगड तालुक्यात २७ शाखा
सिद्धार्थ बोर्डिंग वसतिगृह आजही सुरु
हजारो विध्यार्थी घडविण्यात मोलाचा वाटा
स्वातंत्र्यं सैनिक संघ , अंधश्रद्धा निर्मूलन समिती , बेळगावमार्ग आणि कुस्तीगीर संघटना यात सहभाग