म्हादई पाणी वाटपात आम्हाला प्रोटोकॉल प्रतिष्ठा महत्वाची नसून काही करून हा तिढा सुटू देत, लोकांची समस्या खूप महत्वाची आहे यासाठी कधीही आम्ही चर्चेला तयार आहोत अस वक्तव्य कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री एम बी पाटील यांनी केल आहे. कर्नाटक गोवा पाणी तंटा म्हादई प्रकरणी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बी एस येडियुराप्पा यांना पत्र लिहून याबाबत चर्चा करू अस सकारात्मक उत्तर होत. सिद्धारामयया यांना पत्र लिहिण्या एवजी प्रोटोकॉल मोडून आपल्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला का पत्र लिहिल प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते बोलत होते.
शेतकऱ्यांना पाणी मिळू देत प्यायला पाणी मिळू देत ही आमची भावना आहे त्यामुळे उद्या जरी पर्रीकर यांनी बैठक बोलावली तरी आम्ही त्यांच्या सोबत चर्चा करू मुख्यमंत्री चर्चेला कुठेही कधीही तयार आहेत म्हादई तिढा सोडवण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करू अस देखील पाटील यांनी स्पष्ट केल.२००२ पाणी लवाद निकाला नुसार कर्नाटकला ७.५६ टी एम सी पाणी ध्या दोन्ही मुख्यमंत्री चर्चा करून एम ओ यु देऊ निवडणुका अगोदर हा प्रश्न निकालात काढू अस ही ते म्हणाले.