कळसा भांडुरा म्हादई नदीचा पाणी वाटप वादा प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष बी एस येडियुरप्पा यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिलेल्या पत्रास पर्रीकर याना सकारात्मक उत्तर दिले आहे . येडियुरप्पा आणि पर्रीकर यांची दिल्लीत भाजप पक्षाच्या बैठकी दरम्यान भेट झाली होती .
म्हादई नदी पाणी वाटप तंटा सध्या जल लवादा समोर प्रलंबित आहे मानवतेचा दृष्टिकोन समोर ठेऊन केवळ उत्तर कर्नाटकातील दुष्काळ ग्रस्त भागातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा म्हणून चर्चा करण्यास काहीच हरकत नाही असं पत्रात म्हटलं आहे. या चर्चेत केवळ पिण्याच्या पाण्या बद्दल चर्चा करण्यात यावी कोणताही पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन ठेऊन चर्चा होऊ नये असे देखील त्यांनी पत्रात नमूद करून चर्चेची तयारी दर्शवली आहे .