गोकाक येथील लक्ष्मी साखर कारखान्याच थकीत बिलासाठी शेतकऱ्यांनी बेळगावातील चननमा चौकात अर्ध नग्न अवस्थेत लोटांगण करून आंदोलन केले आहे.
गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेळगाव दौऱ्यावर आहेत त्यामुळे लक्ष वेधून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लोटांगण करून आंदोलन केले आहे. गोकाक मधील विविध विकास कामा उदघाटना करीत सिद्धरामय्या आज बेळगाव दौऱ्यावर आहेत.
ऊसाच्या थकीत बिलासाठी काल पासूनच हे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करत आहेत त्यांनी आज देखील आपलं आंदोलन पुढेच केलं आहे.यावेळी शेतकऱ्यां कडून रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात घोषणा बाजी देखील करण्यात आली आहे.