बुधवारची रात्र बेळगाव शहरातील लोकांसाठी हूडहूड भरणारी ठरणार आहे कारण पारा ११.७ वर घसरल्याने गारठ्यात कमालीची वाढ झाली आहे. ख्रिस्तमस आणि नवीन वर्षाच्या आगमनाच्या पाश्वभूमीवर बेळगावात थंडी वाढल्याने लोकांना सुट्टीचा आनंद घेता येणार आहे.
बुधवारी सायंकाळी ५ :३० वाजता शहराच कमाल तापमान २९.५ डिग्री सेल्सियस तर किमान तापमान ११.७ डिग्री सेल्सियस नोंद झाल आहे जे नॉर्मल तापमाना पेक्षा २ डिग्री कमी आहे. हवामान खात्याच्या अंदाजा नुसार आगामी काही दिवसात सरासरी तापमान २९ आणि १२ अस असणार असल्यामुळे थंडीच असणार आहे.
बेळगाव शहरातील डिसेंबर महिन्यातील कायमच कमीत अमी तापमान ४ डिसेंबर १९७० रोजी ७.७ डिग्री सेल्सियस नोंद होत त्या नंतर १० डिसेंबर २०१६ या दिवशी म्हणजेच मागील वर्षी ८.९ इतक्या कमी तापमानाची नोंद झाली होती.